Connect with us

Uncategorized

नांदेड विशेष: व्यापारी पण वंचीतां पैकीच एक आहे – प्रवीण सोनी

Published

on

SD24 News Network Network : Box of Knowledge
व्यापारी मित्रांनो, थोडे आपापल्या जाती धर्म व लागे बांध्यांच्या बाहेर येऊन विचार करा आणि बघा आपल्या साठी सगळ्याच प्रस्थापीतांनी आज वर काय केले आहे व “आपण” देशाच्या अर्थ व्यवस्थेला बळकटी देण्या साठी काय काय केले ते.
आपणच आहोत ते जे विविध कायद्यांच्या कचाट्यांतं गुरफटून व कर व्यवस्थेच्या जाचक जुलमी जटीलता आणि अवास्तव दरांना सोसत तग धरुन आहोत. आपणच आहोत ते जे सरकारच्या तिजो-या भरत अनेक बेरोजगार व गरजवंतांना आपापल्या व्यवसायांत रोजगार देत सरकारचा भार कमी करत आहोत. एवढे करुन नशीबी काय तर दंड, व्याज, कारवायांचे व जपत्यांचे भयावह दडपण.
एक ओमप्रकाश पोकरणा सोडले तर आज पर्यंत आपणच निवडून दिलेल्या, आपल्याच जाती धर्माचे, आपलेच निकटवर्ती समजल्या जाणा-यां पैकी कुणी हो आपल्या साठी बोलले, लढले वा आपल्या पाठीशी ऊभे राहीले ? विचारा स्वतःला प्रश्न – मागील 15 – 20 वर्षांत नेते बनलेले, विविध पदे भोगलेले हे सर्व पक्षीय कोठून कुठ पर्यंत गेले व आपण कोठे आहोत ते ? यांना कायद्यांचा व व्यवस्थेचा त्रास किती होतो व आपल्याला किती ते ?
आपलाच एक भाऊ विनोद बाहेती. त्याच्यावर काय बेतले याचे हे ज्वलंत उदाहरण. काय सोसले असेल त्याने, काय गुजरले असेल त्याच्यावर, काय घालमेल झाली असेल त्याच्या मनावर हा जाहीर माफीनामा प्रसिद्ध करतांना. काय दोष असेल हो याचा ? हाच ना की एक नाविण्यपूर्ण व्यावसाय उभारायला गेला, कुठे तरी गणीत उलटं पडलं अन कोलमडलं !! असे किती तरी विनोद बाहेती कोठेच दाद, सुनावणी, सवलत, माफी न मिळत असल्याने कुंठत कंठत असतील अपमानास्पद जीवन हिरमुसलेपणाने. काहींनी केल्याही असतील आत्महत्या. नोंद दखल कोठे त्याची. आमच्या करांच्या पैशावर तुम्ही गडगंज होणार, स्वतःच्या राजकीय हितापायी आरक्षण, कर्ज माफ्या, सवलती देणार आणि आम्ही देशोधडीला लागलो काय वा मेलो काय कोण हो ऊभे राहते आपल्या पाठीशी ?
व्यापारी मित्रांनो, देश आपल्या मुळे विकसीत होतोय याची जाण ठेवा. सरकारी सवलतींचे आपणच सर्वाधीक हक्कदार असूनही कायम दुर्लक्षीत राहिल्याने तसे वंचीतच !! म्हणून या वेळी आमचे मत – त्यालाच जो निस्पृहपणे आमच्या पाठीशी राहणार.
प्रवीण सोनी, नांदेड
9422870808

Loading…

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *