नांदेड रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या माननीय खासदारांची वार्षिक बैठक आज दिनांक13 नोवेंबर , 2019 रोजी नांदेड रेल्वेविभागीय कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस 05 खासदार उपस्थित होते. यात श्रीप्रताप पाटील चिखलीकर-नांदेड, श्री हेमंत पाटील-हिंगोली, श्री संजय जाधव-परभणी,श्री सयद इम्तियाजजलील-औरंगाबाद आणि श्री नंदकुमार सिंह चौहान-खंडवा हे पाच खासदार उपस्थित होते. या वार्षिक बैठकी करिता 11 खासदारांना आमंत्रित करण्यात आलेहोते. या बैठकीस श्री गजानन माल्या, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे आणि दक्षिणमध्य रेल्वे क्षेत्रीय कार्यालयातील विविध विभाग प्रमुख, विभागीय रेल्वे व्यवस्थापक,नांदेड आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक, हैदराबाद, तसेच रेल्वे चे इतर वरिष्ठअधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला श्री गजानन माल्या यांनी दक्षिण मध्य रेलवे करत असलेल्याकार्याची उपस्थित खासदार यांना माहिती दिली. यात मानवरहित फाटक कमी करने, प्रवाशीसुविध वाढवने, दुहेरिकरण, विद्युतीकरण, नवीन लिफ्ट – सरकते जीने बसविने, भुयारीपुल-उद्दान पुल उभारने यांचा समावेश आहे.
या बैठकीत नांदेड रेलवे विभागातीलविविध रेलवे विषयांवर चर्चा करण्यात आली. ज्यात नांदेड-मुंबई करीता सुपर फ़ास्टएक्सप्रेस, नांदेड –पुणे करीता नवीन गाड़ी, नांदेड ते पंढरपुर करीता उस्मानाबादमार्गे नवीन गाड़ी, नांदेड ते बासर डेमू ट्रेन, नांदेड-बीदर नवीन लाईन, अजंताएक्सप्रेस च्या वेळेत बदल ना करणे, अकोला-हिंगोली –मुंबई आणि अकोला- हिंगोली – औरंगाबाद नवीन गाडी ,विद्युतीकरण करणे, औरंगाबाद येथे पिट लाईन उभारणे, औरंगाबाद-चाळीसगाव नवीन लाईनटाकणे या मागण्या प्रामुख्याने चर्चिल्या गेल्या. श्री माल्या यांनी उपरोक्त मागण्यांचापूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कळविले. या बैठकी नंतर श्री गजानन माल्या यांनी पत्रकार परिषदेत दक्षिण मध्य रेल्वेनांदेड विभागा करिता करत असलेल्या कार्याची माहिती दिली. ज्यात प्रामुख्यानेमुदखेड-परभणी दुहेरीकरण, अकोला-खांडवा गेज परिवर्तन, नांदेड विभागाचे पूर्ण विद्युतीकरण,नांदेड विभागात सर्व 71 रेल्वे स्थानकावर मुफ्त वाय-फाय सुविधा पुरविल्या, 15 नवीनपादचारी पूल, 27 नवीन हाय लेवेल प्लातफोर्म, 6 स्थानकावर 9 नवीन लिफ्ट उभारणे, 2 स्थानकावर02 नवीन सरकते जिने बसविणे , एल.इ.डी. लाईन लावणे इत्यादीचा समावेश आहे. श्रीमाल्या यांनी कळविले कि मुंबई करिता नवीनगाडी सुरु करणे आणि पुणे करिता नवीन गाडीची मागणी पूर्ण करणे या त्यांच्याप्राथमिकता असतील. आदरणीय संपादक महोदयांना विनंती आहे आपण हि बातमी आपल्यावर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी. .