Connect with us

Uncategorized

टाळीच्या नादात कापूस उत्पादक शेतक-यांचा बळी

Published

on

SD24 News Network Network : Box of Knowledge
सध्या देशात मंदीची लाट आली आहे, आणि ही लाट जसजशी येत जाईल तसतसा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसत जाईल अशी परिस्थिती सध्या देशात चालू आहे. सध्या देशातील कापूस शेतकरी खूप त्रस्त झाला असून मातीमोल किंमतीत कापसाला भाव मिळत आहे. खर्ची केलेले भांडवल देखील पदरी पडत नाही आणि यास कारणीभूत म्हणजे मोदी सरकारने अमेरीकेतील जीन झालेला कापूस ४ हजार प्रति क्विंटल ने आयात केला.
मोदी ने ट्रम्पचा हात हातामध्ये घेऊन टाळी मारली आणि त्या टाळीचं मार्केटिंग करून आपण किती मोठे आहोत याचा फुकटचा रूबाब मिरवून माझ्यासारखा पंतप्रधान दुसरा कुणी होऊच शकत नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पण मोदीच्या या टाळीची किंमत आज कापूस शेतकरी मोजत आहे. याचे भान देखील मोदी सरकारला नाही. परंतु टाळी मारण्यामागे ट्रम्पचा उद्देश इतकाच आहे की सध्या अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारी युद्ध चालू असल्याने चीन अमेरीकेतील कापूस घेत नसल्याने तो जीर्ण अवस्थेत आहे. आपला कापूस भारताने घ्यावा म्हणून मोदी ला ट्रम्पने टाळी देऊन आपले होणारे नुकसान टाळले, परंतु आपले पंतप्रधान टाळी मिळाली याच्यातच खुश आहेत.
मात्र या टाळीच्या नादात गरीब कापूस शेतकरी भरडला गेला आहे. भाजप सरकारने कापूस शेतकऱ्याला उध्वस्त केलं. कापसाला ५५०० प्रतिक्विंटल हमीभाव देण्यात आला असून आज त्या भावात व्यापारी कापूस घ्यायला तयार नाही. कारण त्यामध्ये व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
गेल्या दोन महिन्यापासून गुजरातच्या पोरबंदरामध्ये अमेरीकेतील कापूस ४ हजार प्रतिक्विंटल ने आयात केला जात आहे. त्यामुळे व्यापारी शेतकऱ्याचा कापूस ३५०० प्रतिक्विंटल दरात घेत आहे आणि याचा मोठा फटका कापूस शेतकऱ्यास होत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून रडकुंडीला आला आहे. आणि असाच आपला टीआरपी वाढविण्यासाठी मोदी सरकार कापूस शेतकऱ्यांचा बळी दिलाय.

Loading…


Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *