हदगाव/ हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील काॅग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर यांनी आज मुंबई येथील मातोश्रीवर जावून पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या हस्ते आपल्या हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत आपल्या समर्थकासह प्रवेश केला आहे. चाभरेकर हे हदगाव विधानसभा मतदार संघात काॅग्रेस पक्षाकडून ईच्छुक उमेदवार होते. पक्षाने ऐनवेळी माधवराव पाटील जवळगावकर याना ऊमेदवारी देवून गंगाधर पाटील चाभरेकर याना डावलेले त्यामुळे ते कमालीचे नाराज झाले होते. चाभरेकर हे माजी खासदार राजिव सातव यांचे निकटवर्तिय मानले जातात. सातव यानी पाच वर्षापूर्विच चाभरेकर याना विधानसभेच्या तयारीला लागा म्हणून सुचोवात केले होते. पाच वर्षा पासून चाभरेकर विधानसभेची तयारी करित होते. त्यानी संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. प्रत्येक गावात वाडी तांड्यात आपले कार्यकर्ते तयार केले होते.पण ऐनवेळी पक्षश्रेष्ठिने त्यांची ऊमेदवारी कापून ती जवळगावकर याना दिली असल्यामुळे ते कमालीचे अस्वस्थ झाले होते. त्यांच्या सोबत काॅग्रेसच्या बाबुराव पवार पाथरडकर यांच्या बंधुनी देखील शिवसेनेचे शिवबंधन आपल्या हाती बांधले. त्यामुळे चाभरेकर व पाथरडकर यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेच्या नागेश पाटील आष्टीकरांचे पारडे जड झाल्याचे जनमानसात बोलल्या जात आहे.
हदगाव तालुक्यात पहीले अपक्ष असलेले बाबुराव कदम कोहळीकर विरूध्द काॅग्रेसचे जवळगावकर यांच्यातच खरी लढत होती पंरतु आज काॅग्रेसच्या गंगाधर पाटील व पाथरडकर यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाने शिवसेनेचे नागेश पाटील आष्टिकर विरूध्द अपक्ष ऊमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्यात खरी लढत होणार असल्याचे स्पष्ट चित्र सध्यातरी दिसून येत आहे. संबंध तालुक्यात चाभरेकर व पाथरडकर यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाचीच्या चर्चेला उधान आले आहे. बाबुराव कदमांची वाढती लोकप्रियता व गंगाधर पाटील चाभरेकरांचा शिवसेना प्रवेश यामुळे काॅग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील बॅकफुटवर गेल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. शिवसेनेच्या नागेश पाटील आष्टिकरांची आज घडिला बाजू भक्कम झाल्याचे बोलले जात आहे.
Loading…