सोशल मीडिया दखल
हे झाले वामन मेश्राम चे मुद्दे
:वामन मेश्राम यांचे नोव्हेंबर 2006 चे भाषण ऐकलं, ते आपल्या भाषणात बोलतात की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्ये होणाऱ्या टशन च्या कारणाने काँग्रेसला पाठीमागे टाकून आपण एकट्यानेच पुढं जायचं या उद्देशाने नारायण राणेला शिवसेनेपासून फोडण्याचा कार्यक्रम शरद पवार यांनी चालू केला परंतु 2003 च्या विधानसभा इलेक्शन मध्ये राष्ट्रवादी ला 71 आणि काँग्रेस ला 69 सीट मिळाल्यामुळे काँग्रेसने नारायण राणे यांना आपल्याकडे वळवून आपल्या सिटांची संख्या वाढवून घेतली….! आणि त्यामुळे शरद पवारांना काँग्रेस पुढे आपले गुडघे टेकायला लागले.
आणि मग काँग्रेसला पाठीमागे टाकण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना आपल्याबरोबर घेण्याची खेळी शरद पवार यांनी खेळली त्यामुळं आर.पी.आय चा मास राष्ट्रवादी सोबत गेला. पण राष्ट्रवादी ने आणि काँग्रेसने आंबेडकरवाद्यांचा राजकारणात हत्यार म्हणून वापरच करून घेतला……मग आपण आपला वापर का होऊन द्यायचा…..राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जातीवादी युद्धात महाराष्ट्र जळत असताना आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मध्ये सँडविच का व्हायचं??? आपण गाढव का व्हायचं??? तर आपण गाढव नाही झालं पाहिजे,आपण मूर्ख नाही बनलं पाहिजे.
ते जरी आपल्याला गाढव बनविण्याचा प्रयत्न करत असतील तरी आपल्याला विचार करायला हवा की आपण गाढव व्हायचं की नाही. आणि मग वामन मेश्राम सांगतात की म्हणून मी सांगतोय की आपण आशा हातकंड्याचे बळी होता कामा नये,आपणांस सतर्क राहायला हवे. जर आपण आपले इशू नॅशनल अजेंड्यावर आणू इच्छितोय ते आपल्याला आपले इशू ओळखून हायलाईट केले पाहिजेत आणि त्यासाठी गरज पडली तर आपण मैदानात उतरलं पाहिजे.
आता आपण बामसेफचे कार्यकर्ते पाहुयात
#बाळासाहेब_आंबेडकर काँग्रेस सोबत आघाडी करत नाहीत तर ते भाजपची बी टीम? त्याउलट वामन मेश्राम बोलतायेत की आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या टशन मध्ये पडून आपलं सँडविच का करून घ्यायचा? बाळासाहेब स्वतंत्र लढले तर फडणवीस चा आदेश आला असेल? त्याउलट वामन मेश्राम सांगतायेत की जर आपले इशू नॅशनल अजेंड्यावर आणायचे असतील तर आपल्याला आपले इशू ओळखून हायलाईट केले पाहिजेत आणि त्यासाठी गरज पडली तर आपण मैदानात उतरलं पाहिजे.
#शरद_पवार हे फोडाफोडीच्या राजकारणाचे वस्ताद आहेत हे स्वतः वामन मेश्राम सांगत असताना शरद पवारांना बामसेफच्या स्टेजवर बोलवताय कशाला? शरद_पवार आणि #काँग्रेस जर आंबेडकरवाद्यांचा फक्त वापरच करून घेत असेल तर बाळासाहेब काँग्रेस सोबत आघाडी करीत नाहीत म्हणून त्यांना हिनवण्यासाठी भाजपची बी टीम म्हणताय? तुम्ही अगोदर तुमच्या स्वतःच्या नेत्याला समजून घ्या आणि मग आम्हाला आमचा नेता शिकवा. आणि शरद पवारांनी बहुजनांचा फक्त वापर करून घेतलाय असं तुमचा नेता उर आणि टिर बडवून जर सांगत असेल तर तुमचे कार्यकर्ते त्यांना बहुजनांचा नेता म्हणून का समाजात पुढे करीत आहेत?
बाळासाहेब आंबेडकर नावाचे वादळ सध्या महाराष्ट्रात आलेलं आहे त्यामुळं तुमची पळता भुई थोडी झालेली आहे हे आमच्या लक्षात येतंय. आज शरद पवारांना तुम्ही बहुजन नेत्याचं सर्टिफिकेट दिलंय उद्या बाळासाहेबांना खोटं ठरवण्यासाठी मोदीला बहुजनांचा नेता म्हणून तुमच्या स्टेजवर आणाल. तुमची केविलवाणी धडपड लक्षात येत आहे आमच्या. शेवटी तुम्हाला एकच सांगू इच्छितोय की तुम्ही तुमच्या परीने दूषप्रचार करा आम्ही समर्थ आहोत प्रत्येक आव्हान पेलण्यासाठी
-धन्यवाद
अमोल भैय्या लांडगे
प्रसिद्धी प्रमुख-भारिप बहुजन महासंघ,इंदापुर तालुका. (यांचे वयक्तिक विचार)