एसडी24 ब्यूरो – (Vikas Ahire)
या वृद्ध माणसाचे वय आहे १०२ वर्ष, अर्थात जन्म झाला असेल १९१७ किंवा १९१८ ला, म्हणजे हा मनुष्य अगदी त्याकालापासून भारतात राहतोय जेव्हा संघाच्या स्वप्नातला अखंड भारत होता. आज या वृद्धालाला तो भारतीय असल्याचे सिध्द करायला लागतेय. एक शतक भारतीय म्हणून राहिलेल्या माणसाने आता आपले भारतीयत्व कसे सिध्द करावे बरे? त्यांचा गुन्हा हा होता का फाळणीच्या वेळी त्यांनी भारत निवडला? की त्यांचे नाव मोहम्मद अनुवर आहे हा गुन्हा आहे? कारण जिथे हा मनुष्य १०२ वर्ष भारतात राहिला आहे तरी त्याला भारतीयत्व सिध्द करायला लागतेय. तिथे हिंदू, बौद्ध, पारशी, जैन, सिख हे फक्त ६ वर्ष राहून त्यांचे भारतीयत्व सिध्द होऊ शकते. हाच १०२ आणि ६ मधला फरक मला व्यथित करत असतो. एका क्षणात सगळा मुल्क चित्रपट डोळ्यासमोरून गेला.
“कैसे साबित करे की हम हिंदुस्थानी है?”
Loading…